रेणुका – डॉ. अनिता गुप्ते
हे पुस्तक खूप आवडल, आपण एखादा व्यवसाय सुरू कसा करायचा किंवा कोणता व्यवसाय करावा या साठी नेहमी मार्गदर्शक शोधत असतो हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक आणि व्यवसायाची प्रत्येक बाजू उलगडण्यात नक्कीच मदत करेल.
कोणतंही पुस्तक सुरू करायच्या अगोदर आपण बघतो की नक्की लेखक कोण आहे ? या पुस्तकाचे लेखक आहेत PayPal चे Founder पीटर थील त्यांचे Plantir Tech,Founders fund असे बरेच व्यवसाय आहेत आणि फोर्ब्स २०१४ च्या यादीत त्यांचा ४ था क्रमांक होता अश्या व्यक्तीकडून मिळालेली शिकवण म्हणजे झीरो टू वन.
शीर्षक शून्य ते एक अस का ? कोणताही नवीन व्यवसाय उभा राहतो तो एका कल्पनेने म्हणजे शून्यातून तो कसा असावा कसा नसावा यावर बरीच उदाहरण आणि माहिती इथे आहे फक्त कल्पना व्यवसाय बनवत नाही ती किती वेगळी ते ही तेवढच महत्वाचं असतं. एखाद्या प्रगत व्यवसायाची नक्कल करून व्यवसाय बनत नसतो.
व्यवसाय सुरू करताना एखादी नवीन कल्पना व्यवसातात कशी बदलता येईल कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष्य द्यावे लागेल तसंच प्रत्येक पावलावर येणारे प्रश्न-उत्तर तुम्हाला या पुस्तकात मिळतील एखाद्या व्यवसायाचं Step-By-Step गाईड अस आपण म्हणू शकतो, अनेक उदाहरण आणि मुद्दे सोबत आहेतच. व्यवसाय सुरू केला की मार्केट मध्ये कसा वाढवायचा मग त्यामधील अडचणी आणि मार्गदर्शन शिवाय वेगवेगळ्या कंपनी च्या उदाहरणारसहित मार्केटींग ची माहिती Strategies आणि मुद्देसूद तपशीलवार माहिती तुम्हाला एक वेगळीच दिशा देऊन जाईल. व्यवसायाचा पाया भक्कम करायला खूपच उपयुक्त माहिती मिळेलच.
व्यवसाय म्हणजे माणसं आलीच मग कोणाला कोणती काम द्यावीत, व्यवस्थापनात कोणाचा समावेश असावा कोणाचा नसावा, एम्प्लॉयी कसे निवडावे असे बरेच प्रश्न Zero To One मध्ये खूप चांगल्या प्रकारे हाताळले आहेत, माणसांची निवड तुमच्या व्यवसायाचं भविष्य ठरवते यात शंका नाही.
आज आपण जे अनेक ब्रँड्स बघतो वापरतो जे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत ते सुद्धा एके काळी फक्त शून्य होते पण आज त्या त्या क्षेत्रांत आघाडीवर आहेत अश्या अनेक कंपन्यांबद्दल त्यांच्या मार्केटिंग,फायनान्स आणि ब्रँडिंग बद्दल तुम्हाला खूप गोष्टी या पुस्तकातून नव्याने कळतील
असं हे झिरो टू वन नक्की वाचा आणि खूप सारे व्यवहाराचे नियम आणि सीक्रेट्स जाणून घ्या….
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा