रेणुका – डॉ. अनिता गुप्ते

इमेज
  रेणुका, रेणुकाम्मा, अंबा, योगअंबा आणि एकविरा ही रेणुका माते ची नाव आणि या नावांमागचा पूर्ण प्रवास, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घडवेल. पौराणिक कथा नेहमीच आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात तो काळ आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञान, संस्कार आणि वागण्याच्या पद्धती असं बरंच काही शिकायला मिळतं… असाच अनुभव मला हे पुस्तकं वाचताना आला हे पुस्तक जरी रेणुका या एका नावाने सुरू झालं तरी, रेणुका मातेच्या बालपणापासून प्रत्येक शिकवण राजकन्या ते रेणुकामाँ, योगअंबा ते एकविरा हा प्रवास खूप रोमहर्षक आणि ज्ञानाने भरपूर आहे. ह्या पुस्तकातील एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट खूप खोलवर सांगितली आहे , जसं होळी मध्ये नारळ का टाकतात त्या प्रथेच मूळ आणि त्या मागचा उद्देश्य काय , पूजेला देवांना वाहिला जाणार नारळाचं का ? वनस्पती वैदिक शास्त्र, विज्ञान, शस्त्रक्रिया, ध्यान,साधना आणि नात्यांमधील चढउतार अश्या सर्वच गोष्टींची खूप सुरेख सांगड या पुस्तकात वाचायला मिळते. रेणुका माते चा पुत्र राम पुढे परशुराम कसा झाला आणि परशुरामाची भूमी म्हटली जाणारी कोंकण, आणि दक्षिण भारताचा भाग ही कथा सुद्धा तुम्हाला ...

अटोमिक हॅबिट्स -जेम्स क्लिअर

बरीच पुस्तक वाचली ज्यामध्ये गोल्स कसे सेट करता येतील, गोल्स ठरवताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर वाचायला मिळालं पण या पुस्तकात फक्त गोल्स नाहीत तर त्यापर्यंत जाण्याचा मार्ग आणि आपल्या सवयी यांची चांगलीच सांगड घातली आहे म्हणून यावर थोडंस लिहितोय.

आपण बरेच मोटीवेशनल व्हिडीओ बघतो आणि उत्तेजित होऊन काहीतरी नवीन चालू करतो पण ते किती दिवस टिकत जास्तीत जास्त आठवडा आणि नंतर एक रविवार गेला की सर्व पूर्वपदावर पुन्हा एकदा जुन्या सवई,मग अजून एक व्हिडिओ हा क्रम काही संपत नाही,पण अश्याने सवई बदलतात का ? सवई का सुटत नाहीत ?

सवई काही आपणच लागत नाही आपणच त्या बनवत जातो मग आपण त्या बदलू पण शकतो त्याचे खूप मार्ग या पुस्तकात तुम्हाला मिळतील तेही उदाहरण आणि रिसर्च सहित, आपल्या प्रत्येक लहान कृतीतुन कश्या आपल्या सवई बनतात आणि या कृती बदलल्या की सवई कश्या बदलतात हे खूप छान शब्दात लेखकाने मांडलं आहे.

वर्षांची सवय एका दिवसात सुटेल का की एक दिवसात मी १००% प्रगती करेन ? या साठी या पुस्तकात १% Improvement चा खूप छान फॉर्म्युला सांगितला आहे एका दिवसात फक्त १% Improvement वर आपण लक्ष केंद्रित केल तर १०० दिवसात १००% आणि एका वर्षात ३६५% Improvement कशी करता येईल हे कळेल. गोल्स पेक्षाही त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग महत्वाचा असतो,छोटे छोटे बदल,निर्णय आणि प्रयत्न या तुमच्या पायऱ्या असतात जर तुम्ही पहिल्या पायरीवर पाय न ठेवता जाल तर अडखळलाच ना?तसच प्रत्येक पायरी खूप महत्त्वाची असते आणि गोल्स पर्यंत जाण्याच्या या सिस्टम चा लेखक विस्तृत माहिती देतो.

आपण मुळात खूप आळशी असतो हाताच्या बाजूला जे मिळेल ते आपण करतो जसा मोबाइल चार्जिंग ला असेल तर उठून तो बघणं नकोस वाटत तर पुस्तक कपाटात असेल तर ते नेहमी तिथेच राहत, एकंदर आपल्या सवई आपल्या परिसरावर ठरतात पुस्तक समोर असेल तर ते वाचावस वाटतं असेच छोटे छोटे बदल खूप महत्वाचे ठरतात. चांगल्या सवयींनसाठी आणि वाईट सवयी बदलण्यासाठी फक्त मोटीवेशन नाही तर आपल्या छोट्या छोट्या गोष्टी, परिसर यात बदल करावा लागतो आणि हेच छोटे बदल आपल्याला मोठी स्वप्न आणि आपलं ध्येयं यांची सतत आठवण करून देतात आणि मार्ग चुकू देत नाहीत. स्वप्न बघा पण त्यापर्यंत जाण्याचा मार्गही ठरवा…

असं हे Atomic Habit’s by @JamesClear नक्की वाचा आणि ध्येयपूर्तीसाठी मार्ग स्वतःच तयार करा.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘विंचुर्णीचे धडे’

लमाण – श्रीराम लागू