रेणुका – डॉ. अनिता गुप्ते

इमेज
  रेणुका, रेणुकाम्मा, अंबा, योगअंबा आणि एकविरा ही रेणुका माते ची नाव आणि या नावांमागचा पूर्ण प्रवास, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घडवेल. पौराणिक कथा नेहमीच आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात तो काळ आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञान, संस्कार आणि वागण्याच्या पद्धती असं बरंच काही शिकायला मिळतं… असाच अनुभव मला हे पुस्तकं वाचताना आला हे पुस्तक जरी रेणुका या एका नावाने सुरू झालं तरी, रेणुका मातेच्या बालपणापासून प्रत्येक शिकवण राजकन्या ते रेणुकामाँ, योगअंबा ते एकविरा हा प्रवास खूप रोमहर्षक आणि ज्ञानाने भरपूर आहे. ह्या पुस्तकातील एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट खूप खोलवर सांगितली आहे , जसं होळी मध्ये नारळ का टाकतात त्या प्रथेच मूळ आणि त्या मागचा उद्देश्य काय , पूजेला देवांना वाहिला जाणार नारळाचं का ? वनस्पती वैदिक शास्त्र, विज्ञान, शस्त्रक्रिया, ध्यान,साधना आणि नात्यांमधील चढउतार अश्या सर्वच गोष्टींची खूप सुरेख सांगड या पुस्तकात वाचायला मिळते. रेणुका माते चा पुत्र राम पुढे परशुराम कसा झाला आणि परशुरामाची भूमी म्हटली जाणारी कोंकण, आणि दक्षिण भारताचा भाग ही कथा सुद्धा तुम्हाला ...

Reignited: Scientific Pathways to a Brighter Future

 डॉ. अब्दुल कलाम यांचं Reignited: Scientific Pathways to a Brighter Future

हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांने आणि पालकांनी नक्कीच वाचाव, यातून एक उज्वल भविष्याचा मार्ग नक्कीच मिळेल यात शंका नाही.

या पुस्तकाला शब्दात मांडता येण थोडंस कठीणच आहे पण प्रयत्न करतो.

डॉ. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती आणि एक महान वैज्ञानिक ‘The Missile Man Of India’ म्हणून आपण ओळखतोच त्यांचं प्रत्येक पुस्तक हे नेहमीच प्रेरणा देत आणि वास्तविकता-अनुभवांवर भाष्य करणार असतं.
३८ युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट पदवी, पदमभूषण , पदमविभूषण आणि भारतरत्न अश्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेलेले भारताचे खरे रत्न म्हणजे डॉ. अब्दुल कलाम.

मुलांना कोणत्याही विषयाची आवड ही त्याच्या शालेय जीवनातच लागते आणि तिथून सुरू होतो त्याच्या भविष्याचा प्रवास पण ही आवड त्यांच्या मध्ये रुजवली जाते त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींमुळे शिक्षक, आईवडील, मित्र-परिवाराकडून सतत मिळणाऱ्या महितीतून, आणि त्यातूनच आवड-छंद जोपासले जातात त्यामुळे या पुस्तकात याच दृष्टीने विज्ञानाचे विविध विषय डॉ.कलाम आणि सह-लेखक श्रीजन पाल सिंग यांनी त्यांच्या सखोल अभ्यासातून सहजतेने मांडले आहे.

डॉ.कलाम महान वैज्ञानिक तर होतेच त्यासोबत त्यांना शिकवायची सुद्ध्या खूप आवड होती, वेगवेगळ्या कामांसाठी ते भरपूर देशांमध्ये फिरत असत आणि तिथल्या वैज्ञानिकांना आणि शिक्षकांना ते भेटत असत, त्यातूनच ते वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल- विषयांबद्दल समजून घेत आणि या पुस्तकामध्ये त्यांनी याच विविध क्षेत्रांवर सविस्तर लिहिलं आहे.

या पुस्तकामध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील करिअर निवडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत माहिती आहे आणि त्यांना कलाम सरांच्या अनुभवाची जोड आहे.

या पुस्तकातील प्रत्येक भाग खालील विषयांवर आहे.

१. Robotics – रोबोटिक्स
२ Aeronautics – वैमानिकी
३. Pathologist – पॅथॉलॉजिस्ट
४.Space Scientists – स्पेस सायंटिस्ट
५. Neuroscience – न्यूरो सायंटिस्ट
६. Material Science -मटेरियल सायंटिस्ट
७. पॅलेओन्टोलॉजिस्ट (जीवाश्म, जीवनाची उत्पत्ती इत्यादींचा अभ्यास करणारा)


तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे तो विषय घ्या उदा. रोबोटिक्स
प्रथम, त्या विषयाचा पूर्ण परिचय दिला आहे जेणेकरून त्या क्षेत्रामध्ये नक्की काय काय आहे याची पूर्ण माहिती मिळते सोबतच क्षेत्रातील प्रणेते कोण याबद्दल एक चांगली कल्पना येते. सोबतच डॉ.अब्दुल कलाम सर सुद्धा त्या संदर्भात स्वत: चा अनुभव सांगतात.

परिचयानंतर, त्या क्षेत्राचे महत्त्व आणि उपयोग येतात आणि त्या क्षेत्राबद्दल आणखी माहिती मिळते. जसे की ..
ते कोठे वापरले जाते …?
कधी वापरले होते …?
भविष्यात त्याचा काय फायदा होईल …?
अशा बऱ्याच विषयांची मुद्देसूद मांडणी मिळते.

मग सुरू होतो “विज्ञान शिक्षणासह – संवाद” म्हणजेच आपण FAQ म्हणू शकतो. अतिशय सोप्पे पण खोलवर माहिती देणारे हे प्रश्न उत्तर संवादाच्या रुपात वाचायला मिळतात.
उदाहरणार्थ : बिग बँग थिअरी.
आपण सहज ऐकलं असेल पण त्याबद्दल खूप कमी माहिती आपल्याला असते.
अब्दुल कलाम सरांनी बर्‍याच विलक्षण उदाहरणासोबत यावर खूप छान माहिती दिली आहे जी आपले बरेच समज/ गैरसमज दूर करतील. विशिष्ट क्षेत्रात आपण कसे काम करू शकतो याची प्राथमिक माहितीही ते आपल्याला देतात.
या पुस्तकात पालकांना एक चिठ्ठी देखील देण्यात आली आहे जेथे डॉ.कलाम त्या क्षेत्रातील मुलाच्या प्रतिभेचे पालनपोषण कसे करावे याबद्दल पालकांना सल्ला देतात.

विज्ञानामध्ये प्रचंड रस असलेल्या किशोरवयीन मुलांसाठी हे पुस्तक आदर्श आहे.
पुस्तक खरोखर वाचनीय आहे. त्यामुळे नक्की वाचा आणि तुमचं मत सुदधा नक्की मांडा

Click to Buy



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘विंचुर्णीचे धडे’

लमाण – श्रीराम लागू

अटोमिक हॅबिट्स -जेम्स क्लिअर