रेणुका – डॉ. अनिता गुप्ते
लेखक : युवान तबीब
एक स्पष्ट, अस्खलित आणि सर्वसमावेशक पुस्तक अस या पुस्तकाबद्दल बोलता येईल, हे पुस्तक काहीश्या अश्या पद्धतीने लिहिले गेले आहे की प्रत्येकजण ते सहजपणे समजू शकेल आणि पुस्तकात लिहिलेले नियम रोजच्या जीवनात लागू करु शकतील.
या पुस्तकाचा संदेश सोपा आणि तंतोतंत आहे, “फक्त आपले विचार बदला आणि त्यामुळेच आपले जग बदलेल.”
या पुस्तकातून आकर्षणाचा नियम भौतिकशास्त्रातील नियमांवर कश्या प्रकारे आधारित आहे आणि प्रत्येक क्रियेला त्याची प्रतिक्रिया कशी मिळत जाते हे या पुस्तकात लेखकाने मांडले आहे आहे. मानवी शरीर भौतिकशास्त्राच्या नियमांवर कश्या प्रकारे कार्य करते आणि त्याला हव्या असलेल्या गोष्टी त्याला कश्या मिळवता येतात, नकारात्मक विचारांचे प्रभाव आपल्या जीवनावर कश्या प्रकारे परिणाम करतो आणि आपण ज्या गोष्टी इतरांसाठी बोलतो, विचार करतो त्या स्वतःसाठी सुद्धा कश्या आकर्षित करत असतो असे बरेच मुद्दे लेखकाने या पुस्तकात उलगडून सांगितले आहेत.
सकारात्मक विचार आणि सकारात्मक वर्तन यातूनच आपण एक सकारात्मक आणि संपन्न जीवन जगू शकतो हे साधा आणि सरळ नियम लेखकाने त्याच्या लेखणीतून खूप प्रखर पणे मांडला आहे.
हे सोपे सूत्र आपल्या दैनंदिन जीवनात आणि नातेसंबंध, आरोग्य, प्रेम, व्यवसाय, नोकरी, आजारपण, भावना आणि पैसे कमविणे आणि बरेच काही या सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये लागू केले जाऊ शकते.
लेखकाने एक उदाहरण देत म्हटलंय की जर आजारी व्यक्ती “मी आजारी आहे” असं सतत म्हणत राहिली तर तिला अजून आजारपण येतं आणि जर “मी बरे होत आहे” असा निर्धार मनात आणला तर फरक पडू लागतो
जेव्हा एखादी व्यक्ती वाईट गोष्टींबद्दल सतत तक्रार करीत असते तेव्हा तो मानसिकरित्या आजारी पडतो. यामुळे तो आणखी चिंता, नैराश्य आणि भीतीकडे वळतो. आणि या सर्व कारणांमुळे आत्मविश्वास कमी होतो, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, मज्जासंस्था, डिसऑर्डर, डोकेदुखी, दमा, सर्दी आणि श्वसनविषयक समस्या सुरू होतात. माणूस स्वतः अशा नकारात्मक भावनांचा नाश करू शकतो आणि मजबूत आणि निरोगी होऊ शकतो. मानवाच्या शरीरात अशा प्रकारे निर्मित केले गेले आहे की जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला नकारात्मक विचारातून मुक्त केले, मेंदूला नवीन गोष्टींजवळ नेले तर तो स्वतःला बऱ्याच समस्यांमधून मुक्त करू शकतो.
आजकाल प्रत्येक व्यक्ती अनिश्चित परिस्थितीमुळे नैराश्यात आणि अत्यंत चिंताग्रस्त आहे. म्हणून सर्वांसाठी त्यांचे तणाव सोडण्यासाठी आणि चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी हे पुस्तक एक चांगले स्त्रोत ठरू शकते. चांगले विचार करा आणि आपल्यासाठी चांगले होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा