रेणुका – डॉ. अनिता गुप्ते


 


रेणुका, रेणुकाम्मा, अंबा, योगअंबा आणि एकविरा ही रेणुका माते ची नाव आणि या नावांमागचा पूर्ण प्रवास, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घडवेल.

पौराणिक कथा नेहमीच आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात तो काळ आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञान, संस्कार आणि वागण्याच्या पद्धती असं बरंच काही शिकायला मिळतं… असाच अनुभव मला हे पुस्तकं वाचताना आला हे पुस्तक जरी रेणुका या एका नावाने सुरू झालं तरी, रेणुका मातेच्या बालपणापासून प्रत्येक शिकवण राजकन्या ते रेणुकामाँ, योगअंबा ते एकविरा हा प्रवास खूप रोमहर्षक आणि ज्ञानाने भरपूर आहे.

ह्या पुस्तकातील एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट खूप खोलवर सांगितली आहे , जसं होळी मध्ये नारळ का टाकतात त्या प्रथेच मूळ आणि त्या मागचा उद्देश्य काय , पूजेला देवांना वाहिला जाणार नारळाचं का ? वनस्पती वैदिक शास्त्र, विज्ञान, शस्त्रक्रिया, ध्यान,साधना आणि नात्यांमधील चढउतार अश्या सर्वच गोष्टींची खूप सुरेख सांगड या पुस्तकात वाचायला मिळते.

रेणुका माते चा पुत्र राम पुढे परशुराम कसा झाला आणि परशुरामाची भूमी म्हटली जाणारी कोंकण, आणि दक्षिण भारताचा भाग ही कथा सुद्धा तुम्हाला या पुस्तकात मिळेल एकंदर हे पुस्तक म्हणजे एक पूर्ण प्रवास आहे जो तुम्हाला खूप ठिकाणी घेऊन जाईल अगदी कैलाश ते दक्षिण भरतापर्यंत आणि या प्रवासात तुम्हाला खूप माणसं भेटतील आणि प्रत्येक व्यक्तीकडून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

पौराणिक कथा खरंतर आपल्याला जगण्याचं रहस्य सांगत असतात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर निर्माण होणाऱ्या प्रत्येक भावना आणि मानसिक उलाढाल कशी हाताळावी आणि त्यातून मार्ग कसा काढत जावा ही शिकवण देतात.

असा हा माझा रेणुका पुस्तकाचा प्रवास…

‘रेणुका’ नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिह

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘विंचुर्णीचे धडे’

लमाण – श्रीराम लागू

अटोमिक हॅबिट्स -जेम्स क्लिअर