पोस्ट्स

रेणुका – डॉ. अनिता गुप्ते

इमेज
  रेणुका, रेणुकाम्मा, अंबा, योगअंबा आणि एकविरा ही रेणुका माते ची नाव आणि या नावांमागचा पूर्ण प्रवास, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घडवेल. पौराणिक कथा नेहमीच आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात तो काळ आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञान, संस्कार आणि वागण्याच्या पद्धती असं बरंच काही शिकायला मिळतं… असाच अनुभव मला हे पुस्तकं वाचताना आला हे पुस्तक जरी रेणुका या एका नावाने सुरू झालं तरी, रेणुका मातेच्या बालपणापासून प्रत्येक शिकवण राजकन्या ते रेणुकामाँ, योगअंबा ते एकविरा हा प्रवास खूप रोमहर्षक आणि ज्ञानाने भरपूर आहे. ह्या पुस्तकातील एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट खूप खोलवर सांगितली आहे , जसं होळी मध्ये नारळ का टाकतात त्या प्रथेच मूळ आणि त्या मागचा उद्देश्य काय , पूजेला देवांना वाहिला जाणार नारळाचं का ? वनस्पती वैदिक शास्त्र, विज्ञान, शस्त्रक्रिया, ध्यान,साधना आणि नात्यांमधील चढउतार अश्या सर्वच गोष्टींची खूप सुरेख सांगड या पुस्तकात वाचायला मिळते. रेणुका माते चा पुत्र राम पुढे परशुराम कसा झाला आणि परशुरामाची भूमी म्हटली जाणारी कोंकण, आणि दक्षिण भारताचा भाग ही कथा सुद्धा तुम्हाला ...

मनाचे चमत्कार – डॉ. जोसेफ मर्फी

इमेज
  आपण नक्की काय आहोत आणि आयुष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करू हे आपलेच विचार ठरवतात आपली प्रत्येक गोष्ट   आपलं आरोग्य, आपली संपत्ती, नाती   हे सर्व काही आपण आपल्या सुप्त मनाशी किंवा अवचेतन मनाशी कसा संवाद घालतो यावर अवलंबून असत. जोसेफ मर्फी यांचं   ‘मनाचे चमत्कार’  (Miracle’s of your Mind)  हे पुस्तक यावरच भाष्य करतं वाचनीय, लहान आणि सोप्प अस हे पुस्तक सुप्त मनाला जागृत करण्यासाठी काही पद्धती सांगत. एकदा आपण आपल्या सुप्त मनाची शक्ती जाणण्यास सुरुवात केली आणि त्यावर विश्वास ठेवला की हीच शक्ती आपल्याला मार्ग दाखवते. एक सोप्प आणि आपण सर्वांनीच अनुभवलेलं उदाहरण सांगायचं झालं तर काही वेळा काही प्रश्नांची उत्तरं कितीही शोधली तरी मिळत नाही काय करावं ते सुचत नाही पण अचानक सकाळी उठल्यावर किंवा आंघोळ, दाढी आणि अशी सहज काम करताना त्या प्रश्नाचं उत्तर मिळत खर तर आपण त्या प्रश्नाबद्दल तेव्हा विचारच करत नसतो मग अस का होतं ? याच कारण असतं  आपलं अंतर्मन ते सतत कार्यरत असत आणि आपल्याला मार्ग दाखवत असतं. सतत कार्यरत असलेल्या या अंतर्मनाला तुम्ही स्वतः सूचना देऊन अशी काम क...

लमाण – श्रीराम लागू

इमेज
  नटसम्राट गणपतराव बेलवलकारांनसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे,विचार स्वातंत्र्याच्या चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कुतज्ञता निधीला नेतृत्वदेणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या ‘नाटकी जीवनाला’ खणखणीत शब्दरूप देत आहेत. -लमाण – डॉक्टर श्रीराम लागू ‘लमाण’ या पुस्तकाच्या नावातच लेखकाची या लेखनामागची भूमिका स्पष्ट होते. ‘आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे’ हे शिरवाडकरांचे वाक्य या पुस्तकाचा मुख्य गाभा ‘म्हणून पुस्तकाचे नाव  ‘लमाण’ ३५६ पानांचे हे आत्मचरित्र लागूंनी अगदी मोकळेपणाने लिहिले आहे यामध्ये त्याचं नाटकावर असणार प्रेम , मुख्य म्हणजे हे त्याचं आत्मचरित्र नव्हे, तर जी त्यांची नाट्यसंपदा , चित्रपट प्रवास या सर्व गोष्टींचा धावता आढावा आहे . पुस्तकामध्ये नाटक व त्या सुमारास घडलेल्या घडामोडी तर लिहिल्या आहेतच पण त्या घटनेबाबत /व्यक्तीबद्दल सुद्धा आपली रोखठोक भूमिका स्पष्टपणे मांडली आहे फर्ग्युसनच्या स्नेहसंमेलन  “ भ्रमाचा भोपळा “  या नाटकापासून सुर...

मन मे हैं विश्वास

इमेज
  ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक ‘एकलव्यां’ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे. –  विश्वास नागरे पाटील   (Jt Commissioner of police, Mumbai and Former Commissioner of Police, Nashik) हे पुस्तक वाचायच्या अगोदर काही रिव्ह्यू आणि मित्रांची मत ऐकली, वाचली काहींचं ठाम मत होत कि जर UPSC / MPSC आणि इतर स्पर्धापरीक्ष्यांची तयारी करत असशील तरच वाच …. तेव्हा वाटलं कि यात जास्त या स्पर्धापरीक्ष्याबद्दल टेक्निकल रूपात माहिती द...

द ग्रेटनेस गाईड

इमेज
  लेखक : रॉबिन शर्मा एखादी आदर्श व्यक्ती बघितली किंवा त्यांच्याबद्दल वाचाल कि आपल्याला वाटतं कि  एक अलौकिक, संपन्न आणि प्रभावशाली आयुष्य जगावं आणि एक आदर्श आयुष्य घडवावं. पण एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे कोणत्याही आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया असलेले त्यांच्या  आयुष्याची मूल्ये,  आपल्याला व्यक्तीची प्रगती दिसते सुखी आयुष्य दिसत आणि वरवरचं वागणं सुद्धा उघड डोळ्यांनी पाहतो, पण आपण जेव्हा अश्या व्यक्तींशी संवाद साधतो त्यांची पुस्तक वाचतो तेव्हा त्यांच्या आयुष्याचा-प्रगतीचा पाय हा त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या अनुभवांमध्ये असतो हे कळतं. असाच अनुभव हे पुस्तक वाचताना तुम्हाला येईल. आपल्या आयुष्यातील छोटे छोटे अनुभव आणि मूल्ये रॉबिन शर्मा यांनी या पुस्तकातून मांडली आहेत,  कोणाकडून काय शिकावं ?  आपल्या आयुष्यात भेटलेली व्यक्ती आणि घटना या आपल्याला काही ना काही शिकवत असतात आपल्याला घडवत असतात हा नवा दृष्टीकोन हे पुस्तक देतं. आयुष्य सिम्पल ते ग्रेट बनवण्याचा प्रवास म्हणजे ‘द ग्रेटनेस गाईड’  अत्यंत व्यावहारिक आणि मुद्देसूद अनुभवांची मांडणी आणि साध्या-साध्या गोष्टी...

‘विंचुर्णीचे धडे’

इमेज
  ‘विंचुर्णीचे धडे’ हे पुस्तक फक्त गावाकडच्या गोष्टींचे पुस्तक नाही तर एका स्त्रीच्या मुक्तछंदात जगलेल्या आयुष्याची गोष्ट आहे. फलटणजवळ छोट्या गावात निर्धास्त एकटे राहताना आलेल्या गौरी देशपांडे यांच्या रोजच्या अनुभवांची ही लेखमाला आहे. विंचुर्णीच्या विंचवांचे अनुभव, मांजर कुत्रे पाळण्याची गोष्ट, पाझर तलाव, विंचूर्णीचा लहरी पाऊस आणि तितकीच लहरी मराविमची वीज यासोबत गोरख, नानी, मुकुल या माणसांच्या गोष्टीही पुस्तकात आहेत. गौरी देशपांडेंच्या सहज सुंदर लेखनशैलीमुळे वाचकांना त्यांच्याशी गप्पा मारल्यासारखे वाटेल. गावात राहताना जाती भेद, स्त्री-पुरुष भेद, वेगवेगळ्या समजुती, शहरी संस्कृतीचा पोकळपणा, गावाकडची न बदलण्याची वृत्ती यावर कोणतीही टोकाची टीका न करता मध्येच सहज टाकलेला तिरकस कटाक्ष वाचताना हसू येते. शेवटी विंचुर्णी गावात राहण्यामुळे शिकायला मिळालेले धडे लेखिकेने दिले आहेत. त्यात आयुष्याचे ‘तत्त्वज्ञान’ करू नये हा मोलाचा धडा. कुठल्या अमुक एका घटनेने, वाक्याने, वागण्याने, भूत-वर्तमान-भविष्य सारे झाकोळून टाकायचे नाही. ‘आपली’ माणसे जोडत जायची. ज्यांनी ठोकर दिली ते ‘आपले’ कधी नव्हतेच असे म...

Turning Dreams Into Reality

इमेज
  लेखक : युवान तबीब एक स्पष्ट, अस्खलित आणि सर्वसमावेशक पुस्तक अस या पुस्तकाबद्दल बोलता येईल, हे पुस्तक काहीश्या अश्या पद्धतीने लिहिले गेले आहे की प्रत्येकजण ते सहजपणे समजू शकेल आणि पुस्तकात लिहिलेले नियम रोजच्या जीवनात लागू करु शकतील. या पुस्तकाचा संदेश सोपा आणि तंतोतंत आहे,  “फक्त आपले विचार बदला आणि त्यामुळेच आपले जग बदलेल.” या पुस्तकातून आकर्षणाचा नियम भौतिकशास्त्रातील नियमांवर कश्या प्रकारे आधारित आहे आणि प्रत्येक क्रियेला त्याची प्रतिक्रिया कशी मिळत जाते हे या पुस्तकात लेखकाने मांडले आहे आहे. मानवी शरीर भौतिकशास्त्राच्या नियमांवर कश्या प्रकारे कार्य करते आणि त्याला हव्या असलेल्या गोष्टी त्याला कश्या मिळवता येतात, नकारात्मक विचारांचे प्रभाव आपल्या जीवनावर कश्या प्रकारे परिणाम करतो आणि आपण ज्या गोष्टी इतरांसाठी बोलतो, विचार करतो त्या स्वतःसाठी सुद्धा कश्या आकर्षित करत असतो असे बरेच मुद्दे लेखकाने या पुस्तकात उलगडून सांगितले आहेत. सकारात्मक विचार आणि सकारात्मक वर्तन यातूनच आपण एक सकारात्मक आणि संपन्न जीवन जगू शकतो हे साधा आणि सरळ नियम लेखकाने त्याच्या लेखणीतून खूप प्रखर पणे ...