रेणुका – डॉ. अनिता गुप्ते
लेखक : रॉबिन शर्मा
एखादी आदर्श व्यक्ती बघितली किंवा त्यांच्याबद्दल वाचाल कि आपल्याला वाटतं कि एक अलौकिक, संपन्न आणि प्रभावशाली आयुष्य जगावं आणि एक आदर्श आयुष्य घडवावं.
पण एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे कोणत्याही आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया असलेले त्यांच्या आयुष्याची मूल्ये, आपल्याला व्यक्तीची प्रगती दिसते सुखी आयुष्य दिसत आणि वरवरचं वागणं सुद्धा उघड डोळ्यांनी पाहतो, पण आपण जेव्हा अश्या व्यक्तींशी संवाद साधतो त्यांची पुस्तक वाचतो तेव्हा त्यांच्या आयुष्याचा-प्रगतीचा पाय हा त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या अनुभवांमध्ये असतो हे कळतं. असाच अनुभव हे पुस्तक वाचताना तुम्हाला येईल.
आपल्या आयुष्यातील छोटे छोटे अनुभव आणि मूल्ये रॉबिन शर्मा यांनी या पुस्तकातून मांडली आहेत, कोणाकडून काय शिकावं ? आपल्या आयुष्यात भेटलेली व्यक्ती आणि घटना या आपल्याला काही ना काही शिकवत असतात आपल्याला घडवत असतात हा नवा दृष्टीकोन हे पुस्तक देतं.
आयुष्य सिम्पल ते ग्रेट बनवण्याचा प्रवास म्हणजे ‘द ग्रेटनेस गाईड’ अत्यंत व्यावहारिक आणि मुद्देसूद अनुभवांची मांडणी आणि साध्या-साध्या गोष्टींवर नव्याने विचार करायला हे पुस्तक नक्कीच प्रवृत्त करेल.
या पुस्तकातील १०१ मुद्दे तुम्हाला सर्वकाही देतील असं मी मुळीच म्हणणार नाही पण बरचं काही शिकवून जातील यात शंका नाही.
मला एक गोष्ट विशेष वाटली ती म्हणजे या पुस्तकातील प्रत्येक चॅप्टर (धडा) हा अवघ्यां २ ते ३ पानांमध्ये संपतो आणि नवीन मुद्दे प्रत्येक नवीन चॅप्टर मध्ये मांडले आहेत त्यामुळे तुम्ही कुठूनही हे पुस्तक वाचा तुम्हाला लेखकाला काय म्हणायचे आहे हे नक्की कळतं. प्रत्येक धडा संपला कि त्यामध्ये मांडलेले मुद्दे तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतात आणि धडा संपला कि डोक्यात विचारांचा नवीन धडा रंगू लागतो.
स्वतःची ओळख पटली कि व्यक्ती आयुष्यातील कितीही मोठे प्रश्न सहज सोडवू शकते.
नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा