रेणुका – डॉ. अनिता गुप्ते
मला आवडलेली ‘द अलकेमिस्ट’ ही पाउलो कोएलो यांची कादंबरी, या कादंबरीत मेंढपाळ मुलाचा खजिन्याच्या शोधाचा साहसी प्रवास दाखवला आहे. अगदी छोटीशी पण खूप काही शिकवून जाणारी अशी ही कादंबरी. या कादंबरीत सँटीयागो हा मुलगा एक स्वप्न बघतो ज्यात त्याला दूर कुठेतरी एक खजिना आहे असं दिसतं पण तो गोंधळतो याचा अर्थ काय हेच त्याला कळत नाही तसचं आपणही बरीच स्वप्न बघतो की आयुष्यात काय करावं पण त्यापर्यंत कसं पोहोचाव हे ठरवताच येत नाही कारण असतं आपल्या मनात चाललेला गोंधळ.
गोंधळलेला हा मुलगा काही लोकांची मदत घेतो पण त्याला स्वप्नाचा अर्थ नीट कळतं नाही तो मनातूनच ठरवतो की स्वतःच स्वप्नातली जागा शोधावी, अंतर्मनाचा आवाज हा नेहमी ऐकावा कारण हाच आवाज आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतो, आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो आणि तो आपणच शोधावा.
इथूनच त्याचा प्रवास सुरू होतो,प्रवासात त्याला बरेच चांगले वाईट अनुभव येतात त्याला लुटलं जात मारलं जात आणि खूप चांगली माणसं आणि शिकवणही मिळत जाते. असेच काहीसे अनुभव आपल्याला येत असतात काही वेळा आपण दुःखी होतो खचून जातो आणि वाटतं की बस सोडून द्यावा सगळं अश्या वेळी काय कराव ?
आपण आपल्या प्रवासात फक्त वाईट गोष्टी आणि दुःख यांचा विचार करत राहतो पण खरंतर या गोष्टी घडतात ते तुमच्या ध्येयाला मार्ग मिळावा म्हणून आजूबाजूची प्रत्येक गोष्ट, घटना आपल्याला काही ना काही सांगत असते फक्त आपल्याला ती ओळखायची असते आणि त्याप्रमाणे आपला प्रवास चालू ठेवायचा असतो. आपण आपल्या दृष्टीकोनातून जग बघत असतो जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा जग बदलत,संकटात मार्ग दिसतो आणि आपण आजूबाजूच्या खुणा म्हणजेच आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकू लागतो,संकट आणि सुख-दुःख येणारच पण भावनांच्या पलीकडे जेव्हा आपलं ध्येय आपल्याला खुणावतं तेव्हा आपण त्याकडे चालत राहतो, क्षणिक सुखं आपल्याला खूप आनंद देत, तेव्हा वाटतं की तिथून हलूच नये पण ते किती काळ राहील ? आपल ध्येय आपल्याला मिळालं नाही तर आपण आयुष्य भर सुखी राहू का ? मग अश्यावेळी आपला निर्णय ठरवत की आपण कोणत्या दिशेला चालायचं या कादंबरीत सँटीयागो क्षणिक सुख टाळून ध्येयाची वाट धरतो..
पुढे काय होतं ? तो पोहोचतो का स्वप्नातल्या ठिकाणी ? त्याला खजिना मिळतो का ? असे बरेच प्रश्न असतील ना ? त्यासाठी तुम्ही ही कादंबरी नक्कीच वाचावी कारण या कादंबरीचा प्रवास जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच मार्ग आणि अनुभव येईल तो इथे घेता येणार नाही..
असा हा ‘द अलकेमिस्ट’ चा प्रवास मी माझ्या शब्दांतून थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आवडला असेल नक्कीच Like & Share करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा