रेणुका – डॉ. अनिता गुप्ते

इमेज
  रेणुका, रेणुकाम्मा, अंबा, योगअंबा आणि एकविरा ही रेणुका माते ची नाव आणि या नावांमागचा पूर्ण प्रवास, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घडवेल. पौराणिक कथा नेहमीच आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात तो काळ आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञान, संस्कार आणि वागण्याच्या पद्धती असं बरंच काही शिकायला मिळतं… असाच अनुभव मला हे पुस्तकं वाचताना आला हे पुस्तक जरी रेणुका या एका नावाने सुरू झालं तरी, रेणुका मातेच्या बालपणापासून प्रत्येक शिकवण राजकन्या ते रेणुकामाँ, योगअंबा ते एकविरा हा प्रवास खूप रोमहर्षक आणि ज्ञानाने भरपूर आहे. ह्या पुस्तकातील एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट खूप खोलवर सांगितली आहे , जसं होळी मध्ये नारळ का टाकतात त्या प्रथेच मूळ आणि त्या मागचा उद्देश्य काय , पूजेला देवांना वाहिला जाणार नारळाचं का ? वनस्पती वैदिक शास्त्र, विज्ञान, शस्त्रक्रिया, ध्यान,साधना आणि नात्यांमधील चढउतार अश्या सर्वच गोष्टींची खूप सुरेख सांगड या पुस्तकात वाचायला मिळते. रेणुका माते चा पुत्र राम पुढे परशुराम कसा झाला आणि परशुरामाची भूमी म्हटली जाणारी कोंकण, आणि दक्षिण भारताचा भाग ही कथा सुद्धा तुम्हाला ...

‘How to Win Friends & Influence People’

 नेहमी वाटत कि आपले मित्र बनावे आपला प्रभाव त्यांच्यावर पडावा आणि त्यांनीही आपल्या सोबत मिसळून जावं.पण बऱ्याच वेळा मत पटत नाही वाद होतात मुद्दे पटवण्याचा खटाटोप चालू होतो पण अश्या प्रकारे मित्र बनतात का ? प्रभाव पडतो का ? या पुस्तकामध्ये तुम्हाला हे जाणून घेता येईल ,जश्या आज्जीच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप विचार आणि शिकवण मिळते तसच बरेच छोटे छोटे अनुभव आणि मुद्दे लेखकाने खूप छान घटनांमधून आणि गोष्टींमधून मांडले आहेत,गोष्टीच तात्पर्य म्हणजेच मिळालेली शिकवण.

आपल्या दैनंदिन वर्तनातील बदल हेच आपल्या मित्र बनवण्याचे आणि प्रभाव पाडण्याचं मुख्य मूळ आहे,आपलं मत पटवण्यासाठी कधी कोणावर टीका न करणे, इतरांचे बोलणे पूर्ण ऐकून घेत मनापासून इतरांमध्ये रस ठेवणे,एखाद्याच नाव लक्ष्यात ठेवणं किती महत्वाचं आहे आणि काय वागणुकीत काय बदल घडतात हे कळेल.

या पुस्तकातील हे काही नियम;

१. आपल्यामध्ये इतरांकडून शिकण्याची आणि समजून घेण्याची ताकद आहे आणि तीच मित्र बनण्याच मूळ आहे

२. टीका करून,निंदा करून किंवा तक्रार करून माणसं जोडता येत नाही त्यामुळे ते टाळा

३. दिखाव्याची प्रशंसा आणि हो ला हो म्हणणं टाळा मनापासून प्रशंसा करा.

४. इतरांमध्ये मनापासून रस घ्या (Genuine interest ठेवा )

५. बोलताना नेहमी स्मित हास्य ठेवा

६. प्रत्येकाला स्वतःबद्दल बोलायला आनंद वाटतो त्यांना बोलू द्या, त्यांना त्यांच्याबद्दल विचारा

७. इतरांना महत्व द्या आणि ते प्रामाणिक पणे करा

८. आपली चुकी असेल तर त्वरित मान्य करा

९. जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलण्यात Comfortable होईल तेव्हाच संवाद वाढेल

१०. दुसर्‍या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून गोष्टी पाहण्याचा खरा प्रयत्न करा

हे पुस्तक वाचताना सतत विचार करायला लावत कि आपण कुठे चुकतोय कोणते बदल केले पाहिजेत आणि का ? असे अजून बरेच मुद्दे या पुस्तकात आहेत, मी काही माझ्या शब्दांत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला, नक्की वाचा आणि तुमच्या सुध्या प्रतिक्रिया नक्की लिहा.

Click to Buy-MARATHI



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘विंचुर्णीचे धडे’

लमाण – श्रीराम लागू

अटोमिक हॅबिट्स -जेम्स क्लिअर