पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेणुका – डॉ. अनिता गुप्ते

इमेज
  रेणुका, रेणुकाम्मा, अंबा, योगअंबा आणि एकविरा ही रेणुका माते ची नाव आणि या नावांमागचा पूर्ण प्रवास, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घडवेल. पौराणिक कथा नेहमीच आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात तो काळ आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञान, संस्कार आणि वागण्याच्या पद्धती असं बरंच काही शिकायला मिळतं… असाच अनुभव मला हे पुस्तकं वाचताना आला हे पुस्तक जरी रेणुका या एका नावाने सुरू झालं तरी, रेणुका मातेच्या बालपणापासून प्रत्येक शिकवण राजकन्या ते रेणुकामाँ, योगअंबा ते एकविरा हा प्रवास खूप रोमहर्षक आणि ज्ञानाने भरपूर आहे. ह्या पुस्तकातील एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट खूप खोलवर सांगितली आहे , जसं होळी मध्ये नारळ का टाकतात त्या प्रथेच मूळ आणि त्या मागचा उद्देश्य काय , पूजेला देवांना वाहिला जाणार नारळाचं का ? वनस्पती वैदिक शास्त्र, विज्ञान, शस्त्रक्रिया, ध्यान,साधना आणि नात्यांमधील चढउतार अश्या सर्वच गोष्टींची खूप सुरेख सांगड या पुस्तकात वाचायला मिळते. रेणुका माते चा पुत्र राम पुढे परशुराम कसा झाला आणि परशुरामाची भूमी म्हटली जाणारी कोंकण, आणि दक्षिण भारताचा भाग ही कथा सुद्धा तुम्हाला ...

रेणुका – डॉ. अनिता गुप्ते

इमेज
  रेणुका, रेणुकाम्मा, अंबा, योगअंबा आणि एकविरा ही रेणुका माते ची नाव आणि या नावांमागचा पूर्ण प्रवास, हे पुस्तक तुम्हाला नक्कीच घडवेल. पौराणिक कथा नेहमीच आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात तो काळ आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञान, संस्कार आणि वागण्याच्या पद्धती असं बरंच काही शिकायला मिळतं… असाच अनुभव मला हे पुस्तकं वाचताना आला हे पुस्तक जरी रेणुका या एका नावाने सुरू झालं तरी, रेणुका मातेच्या बालपणापासून प्रत्येक शिकवण राजकन्या ते रेणुकामाँ, योगअंबा ते एकविरा हा प्रवास खूप रोमहर्षक आणि ज्ञानाने भरपूर आहे. ह्या पुस्तकातील एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट खूप खोलवर सांगितली आहे , जसं होळी मध्ये नारळ का टाकतात त्या प्रथेच मूळ आणि त्या मागचा उद्देश्य काय , पूजेला देवांना वाहिला जाणार नारळाचं का ? वनस्पती वैदिक शास्त्र, विज्ञान, शस्त्रक्रिया, ध्यान,साधना आणि नात्यांमधील चढउतार अश्या सर्वच गोष्टींची खूप सुरेख सांगड या पुस्तकात वाचायला मिळते. रेणुका माते चा पुत्र राम पुढे परशुराम कसा झाला आणि परशुरामाची भूमी म्हटली जाणारी कोंकण, आणि दक्षिण भारताचा भाग ही कथा सुद्धा तुम्हाला ...

मनाचे चमत्कार – डॉ. जोसेफ मर्फी

इमेज
  आपण नक्की काय आहोत आणि आयुष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करू हे आपलेच विचार ठरवतात आपली प्रत्येक गोष्ट   आपलं आरोग्य, आपली संपत्ती, नाती   हे सर्व काही आपण आपल्या सुप्त मनाशी किंवा अवचेतन मनाशी कसा संवाद घालतो यावर अवलंबून असत. जोसेफ मर्फी यांचं   ‘मनाचे चमत्कार’  (Miracle’s of your Mind)  हे पुस्तक यावरच भाष्य करतं वाचनीय, लहान आणि सोप्प अस हे पुस्तक सुप्त मनाला जागृत करण्यासाठी काही पद्धती सांगत. एकदा आपण आपल्या सुप्त मनाची शक्ती जाणण्यास सुरुवात केली आणि त्यावर विश्वास ठेवला की हीच शक्ती आपल्याला मार्ग दाखवते. एक सोप्प आणि आपण सर्वांनीच अनुभवलेलं उदाहरण सांगायचं झालं तर काही वेळा काही प्रश्नांची उत्तरं कितीही शोधली तरी मिळत नाही काय करावं ते सुचत नाही पण अचानक सकाळी उठल्यावर किंवा आंघोळ, दाढी आणि अशी सहज काम करताना त्या प्रश्नाचं उत्तर मिळत खर तर आपण त्या प्रश्नाबद्दल तेव्हा विचारच करत नसतो मग अस का होतं ? याच कारण असतं  आपलं अंतर्मन ते सतत कार्यरत असत आणि आपल्याला मार्ग दाखवत असतं. सतत कार्यरत असलेल्या या अंतर्मनाला तुम्ही स्वतः सूचना देऊन अशी काम क...

लमाण – श्रीराम लागू

इमेज
  नटसम्राट गणपतराव बेलवलकारांनसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे,विचार स्वातंत्र्याच्या चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कुतज्ञता निधीला नेतृत्वदेणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या ‘नाटकी जीवनाला’ खणखणीत शब्दरूप देत आहेत. -लमाण – डॉक्टर श्रीराम लागू ‘लमाण’ या पुस्तकाच्या नावातच लेखकाची या लेखनामागची भूमिका स्पष्ट होते. ‘आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे’ हे शिरवाडकरांचे वाक्य या पुस्तकाचा मुख्य गाभा ‘म्हणून पुस्तकाचे नाव  ‘लमाण’ ३५६ पानांचे हे आत्मचरित्र लागूंनी अगदी मोकळेपणाने लिहिले आहे यामध्ये त्याचं नाटकावर असणार प्रेम , मुख्य म्हणजे हे त्याचं आत्मचरित्र नव्हे, तर जी त्यांची नाट्यसंपदा , चित्रपट प्रवास या सर्व गोष्टींचा धावता आढावा आहे . पुस्तकामध्ये नाटक व त्या सुमारास घडलेल्या घडामोडी तर लिहिल्या आहेतच पण त्या घटनेबाबत /व्यक्तीबद्दल सुद्धा आपली रोखठोक भूमिका स्पष्टपणे मांडली आहे फर्ग्युसनच्या स्नेहसंमेलन  “ भ्रमाचा भोपळा “  या नाटकापासून सुर...

मन मे हैं विश्वास

इमेज
  ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक ‘एकलव्यां’ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे. –  विश्वास नागरे पाटील   (Jt Commissioner of police, Mumbai and Former Commissioner of Police, Nashik) हे पुस्तक वाचायच्या अगोदर काही रिव्ह्यू आणि मित्रांची मत ऐकली, वाचली काहींचं ठाम मत होत कि जर UPSC / MPSC आणि इतर स्पर्धापरीक्ष्यांची तयारी करत असशील तरच वाच …. तेव्हा वाटलं कि यात जास्त या स्पर्धापरीक्ष्याबद्दल टेक्निकल रूपात माहिती द...

द ग्रेटनेस गाईड

इमेज
  लेखक : रॉबिन शर्मा एखादी आदर्श व्यक्ती बघितली किंवा त्यांच्याबद्दल वाचाल कि आपल्याला वाटतं कि  एक अलौकिक, संपन्न आणि प्रभावशाली आयुष्य जगावं आणि एक आदर्श आयुष्य घडवावं. पण एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे कोणत्याही आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया असलेले त्यांच्या  आयुष्याची मूल्ये,  आपल्याला व्यक्तीची प्रगती दिसते सुखी आयुष्य दिसत आणि वरवरचं वागणं सुद्धा उघड डोळ्यांनी पाहतो, पण आपण जेव्हा अश्या व्यक्तींशी संवाद साधतो त्यांची पुस्तक वाचतो तेव्हा त्यांच्या आयुष्याचा-प्रगतीचा पाय हा त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या अनुभवांमध्ये असतो हे कळतं. असाच अनुभव हे पुस्तक वाचताना तुम्हाला येईल. आपल्या आयुष्यातील छोटे छोटे अनुभव आणि मूल्ये रॉबिन शर्मा यांनी या पुस्तकातून मांडली आहेत,  कोणाकडून काय शिकावं ?  आपल्या आयुष्यात भेटलेली व्यक्ती आणि घटना या आपल्याला काही ना काही शिकवत असतात आपल्याला घडवत असतात हा नवा दृष्टीकोन हे पुस्तक देतं. आयुष्य सिम्पल ते ग्रेट बनवण्याचा प्रवास म्हणजे ‘द ग्रेटनेस गाईड’  अत्यंत व्यावहारिक आणि मुद्देसूद अनुभवांची मांडणी आणि साध्या-साध्या गोष्टी...

‘विंचुर्णीचे धडे’

इमेज
  ‘विंचुर्णीचे धडे’ हे पुस्तक फक्त गावाकडच्या गोष्टींचे पुस्तक नाही तर एका स्त्रीच्या मुक्तछंदात जगलेल्या आयुष्याची गोष्ट आहे. फलटणजवळ छोट्या गावात निर्धास्त एकटे राहताना आलेल्या गौरी देशपांडे यांच्या रोजच्या अनुभवांची ही लेखमाला आहे. विंचुर्णीच्या विंचवांचे अनुभव, मांजर कुत्रे पाळण्याची गोष्ट, पाझर तलाव, विंचूर्णीचा लहरी पाऊस आणि तितकीच लहरी मराविमची वीज यासोबत गोरख, नानी, मुकुल या माणसांच्या गोष्टीही पुस्तकात आहेत. गौरी देशपांडेंच्या सहज सुंदर लेखनशैलीमुळे वाचकांना त्यांच्याशी गप्पा मारल्यासारखे वाटेल. गावात राहताना जाती भेद, स्त्री-पुरुष भेद, वेगवेगळ्या समजुती, शहरी संस्कृतीचा पोकळपणा, गावाकडची न बदलण्याची वृत्ती यावर कोणतीही टोकाची टीका न करता मध्येच सहज टाकलेला तिरकस कटाक्ष वाचताना हसू येते. शेवटी विंचुर्णी गावात राहण्यामुळे शिकायला मिळालेले धडे लेखिकेने दिले आहेत. त्यात आयुष्याचे ‘तत्त्वज्ञान’ करू नये हा मोलाचा धडा. कुठल्या अमुक एका घटनेने, वाक्याने, वागण्याने, भूत-वर्तमान-भविष्य सारे झाकोळून टाकायचे नाही. ‘आपली’ माणसे जोडत जायची. ज्यांनी ठोकर दिली ते ‘आपले’ कधी नव्हतेच असे म...

Turning Dreams Into Reality

इमेज
  लेखक : युवान तबीब एक स्पष्ट, अस्खलित आणि सर्वसमावेशक पुस्तक अस या पुस्तकाबद्दल बोलता येईल, हे पुस्तक काहीश्या अश्या पद्धतीने लिहिले गेले आहे की प्रत्येकजण ते सहजपणे समजू शकेल आणि पुस्तकात लिहिलेले नियम रोजच्या जीवनात लागू करु शकतील. या पुस्तकाचा संदेश सोपा आणि तंतोतंत आहे,  “फक्त आपले विचार बदला आणि त्यामुळेच आपले जग बदलेल.” या पुस्तकातून आकर्षणाचा नियम भौतिकशास्त्रातील नियमांवर कश्या प्रकारे आधारित आहे आणि प्रत्येक क्रियेला त्याची प्रतिक्रिया कशी मिळत जाते हे या पुस्तकात लेखकाने मांडले आहे आहे. मानवी शरीर भौतिकशास्त्राच्या नियमांवर कश्या प्रकारे कार्य करते आणि त्याला हव्या असलेल्या गोष्टी त्याला कश्या मिळवता येतात, नकारात्मक विचारांचे प्रभाव आपल्या जीवनावर कश्या प्रकारे परिणाम करतो आणि आपण ज्या गोष्टी इतरांसाठी बोलतो, विचार करतो त्या स्वतःसाठी सुद्धा कश्या आकर्षित करत असतो असे बरेच मुद्दे लेखकाने या पुस्तकात उलगडून सांगितले आहेत. सकारात्मक विचार आणि सकारात्मक वर्तन यातूनच आपण एक सकारात्मक आणि संपन्न जीवन जगू शकतो हे साधा आणि सरळ नियम लेखकाने त्याच्या लेखणीतून खूप प्रखर पणे ...

Reignited: Scientific Pathways to a Brighter Future

इमेज
  डॉ. अब्दुल कलाम यांचं   Reignited: Scientific Pathways to a Brighter Future हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांने आणि पालकांनी नक्कीच वाचाव, यातून एक उज्वल भविष्याचा मार्ग नक्कीच मिळेल यात शंका नाही. या पुस्तकाला शब्दात मांडता येण थोडंस कठीणच आहे पण प्रयत्न करतो. डॉ. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती आणि एक महान वैज्ञानिक  ‘The Missile Man Of India’  म्हणून आपण ओळखतोच त्यांचं प्रत्येक पुस्तक हे नेहमीच प्रेरणा देत आणि वास्तविकता-अनुभवांवर भाष्य करणार असतं. ३८ युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट पदवी, पदमभूषण , पदमविभूषण आणि भारतरत्न  अश्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेलेले भारताचे खरे रत्न म्हणजे  डॉ. अब्दुल कलाम. मुलांना कोणत्याही विषयाची आवड ही त्याच्या शालेय जीवनातच लागते आणि तिथून सुरू होतो त्याच्या भविष्याचा प्रवास पण ही आवड त्यांच्या मध्ये रुजवली जाते त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींमुळे शिक्षक, आईवडील, मित्र-परिवाराकडून सतत मिळणाऱ्या महितीतून, आणि त्यातूनच आवड-छंद जोपासले जातात त्यामुळे या पुस्तकात याच दृष्टीने विज्ञानाचे विविध विषय  डॉ.कला...

स्वभाव-विभाव

इमेज
  जेव्हा एखाद्या पुस्तकाचं नाव आपण वाचतो तेव्हा त्या पुस्तकात काय असेल याबद्दल बऱ्याच कल्पना वाचण्यापूर्वीच करून ठेवतो तसाच काहीसा अनुभव हे पुस्तक वाचताना आला नाव ‘स्वभाव-विभाव’ आणि लेखक एक मनोविकासतज्ञ मग हे पुस्तक नक्कीच विचार कसे Control करायचे यावरच असावं हा ग्रह झाला. पण जस-जस वाचत गेलो हे पुस्तक फक्त विचार आणि ते हाताळण्याचा पद्धती यांच्या खूप पलीकडे आहे हे जाणवू लागलं, प्रत्येक भाग नवीन भावना, स्वभाव आणि विचार यांना हात घालत होता आणि माझ्याच आयुष्यात आलेले अनुभव मी घेतलेले निर्णय आणि त्यावेळची मानसिकता यावर पुन्हा विचार करायला लावत होता. बालपणापासून आत्तापर्यंत चा प्रवास, आयुष्यात भेटलेली प्रत्येक व्यक्ती त्यांची मानसिकता, मनात असलेले कितीतरी प्रश्न आणि एक नवीन दृष्टीकोन घेऊन या पुस्तकातून बाहेर आल्याचा अनुभव होतोय यात शंका नाही, एखाद्या गोष्टीकडे, व्यक्तीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन हे पुस्तक नक्कीच देत. आपल्या विचारांची शक्ती किती आहे ती कुठे केंद्रित करता येईल, आपण कसे सतत शिकत असतो आणि शिकत राहणार,मनाची चंचलता,सुख दुःखांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, Overthinking म्हणजे नक्की का...

द अलकेमिस्ट

इमेज
  मला आवडलेली ‘द अलकेमिस्ट’ ही पाउलो कोएलो यांची कादंबरी, या कादंबरीत मेंढपाळ मुलाचा खजिन्याच्या शोधाचा साहसी प्रवास दाखवला आहे. अगदी छोटीशी पण खूप काही शिकवून जाणारी अशी ही कादंबरी. या कादंबरीत सँटीयागो हा मुलगा एक स्वप्न बघतो ज्यात त्याला दूर कुठेतरी एक खजिना आहे असं दिसतं पण तो गोंधळतो याचा अर्थ काय हेच त्याला कळत नाही तसचं आपणही बरीच स्वप्न बघतो की आयुष्यात काय करावं पण त्यापर्यंत कसं पोहोचाव हे ठरवताच येत नाही कारण असतं आपल्या मनात चाललेला गोंधळ. गोंधळलेला हा मुलगा काही लोकांची मदत घेतो पण त्याला स्वप्नाचा अर्थ नीट कळतं नाही तो मनातूनच ठरवतो की स्वतःच स्वप्नातली जागा शोधावी, अंतर्मनाचा आवाज हा नेहमी ऐकावा कारण हाच आवाज आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतो, आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो आणि तो आपणच शोधावा. इथूनच त्याचा प्रवास सुरू होतो,प्रवासात त्याला बरेच चांगले वाईट अनुभव येतात त्याला लुटलं जात मारलं जात आणि खूप चांगली माणसं आणि शिकवणही मिळत जाते. असेच काहीसे अनुभव आपल्याला येत असतात काही वेळा आपण दुःखी होतो खचून जातो आणि वाटतं की बस सोडून द्यावा सगळं अश्या वेळी का...

‘How to Win Friends & Influence People’

इमेज
  नेहमी वाटत कि आपले मित्र बनावे आपला प्रभाव त्यांच्यावर पडावा आणि त्यांनीही आपल्या सोबत मिसळून जावं.पण बऱ्याच वेळा मत पटत नाही वाद होतात मुद्दे पटवण्याचा खटाटोप चालू होतो पण   अश्या प्रकारे मित्र बनतात का ? प्रभाव पडतो का ?  या पुस्तकामध्ये तुम्हाला हे जाणून घेता येईल ,जश्या आज्जीच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप विचार आणि शिकवण मिळते तसच बरेच छोटे छोटे अनुभव आणि मुद्दे लेखकाने खूप छान घटनांमधून आणि गोष्टींमधून मांडले आहेत,गोष्टीच तात्पर्य म्हणजेच मिळालेली शिकवण. आपल्या दैनंदिन वर्तनातील बदल हेच आपल्या मित्र बनवण्याचे आणि प्रभाव पाडण्याचं मुख्य मूळ आहे,आपलं मत पटवण्यासाठी कधी कोणावर टीका न करणे, इतरांचे बोलणे पूर्ण ऐकून घेत मनापासून इतरांमध्ये रस ठेवणे,एखाद्याच नाव लक्ष्यात ठेवणं किती महत्वाचं आहे आणि काय वागणुकीत काय बदल घडतात हे कळेल. या पुस्तकातील हे काही नियम; १. आपल्यामध्ये इतरांकडून शिकण्याची आणि समजून घेण्याची ताकद आहे आणि तीच मित्र बनण्याच मूळ आहे २. टीका करून,निंदा करून किंवा तक्रार करून माणसं जोडता येत नाही त्यामुळे ते टाळा ३. दिखाव्याची प्रशंसा आणि हो ला हो म...

मुसाफिर-अच्युत गोडबोले

इमेज
  हि एका व्यक्तीची आत्मकथा आहे यावर खरतर विश्वासच बसत नाही, सोलापूर सारख्या छोट्याश्या गावातुन सुरु झालेला हा प्रवास तुम्हाला भारतासोबत अमेरिका, जपान आणि बऱ्याच देशांमध्ये घेऊन जाईल आणि बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींशी भेटही करून देईल. जीवनातील साहित्याचा, संगीताचा प्रचंड प्रभाव आणि जडलेलं नातं हळुवारपणे उलगडत जाईल. व्यापक नजर,अफाट कुतूहल आणि त्यातून घडलेलं अफाट वाचन याची प्रचिती होईल खरतर मला आज कोणी विचारलं कि अच्युत गोडबोले कोण तर मला म्हणावं लागेल  Treasure of Knowledge, Great Reader and Great Leader. विज्ञान, कला, विचाररांचा भांडार, चित्र, संगीत, समाजकार्य, चळवळी, तुरुंगवास, दृष्टिकोन, त्यासोबतच IT क्षेत्रातील कामगिरी,अनेक कंपन्यांचे CEO पद ,अर्थशास्त्र आणि बरच काही,  एक व्यक्तीने तिच्या आयुष्यात एवढं अफाट ज्ञान आणि चढउतार बघितले कि कोणत्या क्षेत्राबद्दल बोलू हेच कळत नाही. पंडित जसराज,दुर्गा भागवत, भीमसेन जोशी, मनोहर ओक, अतुल खाते,नारायण सुर्वे  आणि बऱ्याच व्यक्तीशी ओळख आणि अनुभव एवढ्या विस्तृत पणे वाचायला / अनुभवायला मिळाले कि वाचताना गुंग होऊन गेलो. हे आत्मचरित्र वा...

पीटर थील यांचं ‘झिरो टू वन’

इमेज
  हे पुस्तक खूप आवडल, आपण एखादा व्यवसाय सुरू कसा करायचा किंवा कोणता व्यवसाय करावा या साठी नेहमी मार्गदर्शक शोधत असतो हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक आणि व्यवसायाची प्रत्येक बाजू उलगडण्यात नक्कीच मदत करेल. कोणतंही पुस्तक सुरू करायच्या अगोदर आपण बघतो की नक्की लेखक कोण आहे ? या पुस्तकाचे लेखक आहेत  PayPal चे Founder पीटर थील त्यांचे Plantir Tech,Founders fund  असे बरेच व्यवसाय आहेत आणि फोर्ब्स २०१४ च्या यादीत त्यांचा ४ था क्रमांक होता अश्या व्यक्तीकडून मिळालेली शिकवण म्हणजे  झीरो टू वन . शीर्षक शून्य ते एक अस का ?  कोणताही नवीन व्यवसाय उभा राहतो तो एका कल्पनेने म्हणजे शून्यातून तो कसा असावा कसा नसावा यावर बरीच उदाहरण आणि माहिती इथे आहे फक्त कल्पना व्यवसाय बनवत नाही ती किती वेगळी ते ही तेवढच महत्वाचं असतं. एखाद्या प्रगत व्यवसायाची नक्कल करून व्यवसाय बनत नसतो. व्यवसाय सुरू करताना एखादी नवीन कल्पना व्यवसातात कशी बदलता येईल कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष्य द्यावे लागेल तसंच प्रत्येक पावलावर येणारे प्रश्न-उत्तर तुम्हाला या पुस्तकात मिळतील एखाद्या व्यवसायाचं Step-By-Step गाई...

अटोमिक हॅबिट्स -जेम्स क्लिअर

इमेज
बरीच पुस्तक वाचली ज्यामध्ये गोल्स कसे सेट करता येतील, गोल्स ठरवताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर वाचायला मिळालं पण या पुस्तकात फक्त गोल्स नाहीत तर त्यापर्यंत जाण्याचा मार्ग आणि आपल्या सवयी यांची चांगलीच सांगड घातली आहे म्हणून यावर थोडंस लिहितोय. आपण बरेच मोटीवेशनल व्हिडीओ बघतो आणि उत्तेजित होऊन काहीतरी नवीन चालू करतो पण ते किती दिवस टिकत जास्तीत जास्त आठवडा आणि नंतर एक रविवार गेला की सर्व पूर्वपदावर पुन्हा एकदा जुन्या सवई,मग अजून एक व्हिडिओ हा क्रम काही संपत नाही,पण  अश्याने सवई बदलतात का ? सवई का सुटत नाहीत ? सवई काही आपणच लागत नाही आपणच त्या बनवत जातो मग आपण त्या बदलू पण शकतो त्याचे खूप मार्ग या पुस्तकात तुम्हाला मिळतील तेही उदाहरण आणि रिसर्च सहित, आपल्या प्रत्येक लहान कृतीतुन कश्या आपल्या सवई बनतात आणि या कृती बदलल्या की सवई कश्या बदलतात हे खूप छान शब्दात लेखकाने मांडलं आहे. वर्षांची सवय एका दिवसात सुटेल का की एक दिवसात मी १००% प्रगती करेन ? या साठी या पुस्तकात १% Improvement चा खूप छान फॉर्म्युला सांगितला आहे एका दिवसात फक्त १% Improvement वर आपण लक्ष केंद्रित केल तर १०० दिवसा...